IND vs SA: अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या खांद्याला दुखापत

  76

भारत-दक्षिण अफ्रिका दुसरी कसोटी नाही खेळणार


केपटाऊन (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा गोलंदाज-अष्टपैलू शार्दुल ठाकूर शनिवारी सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना शार्दुलच्या खांद्याला चेंडू लागला. या दुखापतीची तीव्रता अद्याप कळू शकलेली नसून त्याचे स्कॅनिंग होण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.


ही घटना सराव सुरू झाल्यानंतर १५ मिनिटांनी घडली, जेव्हा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप शार्दुलला थ्रोडाउन सराव देत होते. शार्दुलला शॉर्ट बॉल खेळता आला नाही आणि चेंडू त्याच्या खांद्यावर लागला. चेंडू लागल्यानंतर शार्दुलला खूप अस्वस्थ वाटत होते. पण, मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूने नेटमध्ये फलंदाजी सुरूच ठेवली.


एकदा त्याने फलंदाजी पूर्ण केल्यावर, फिजिओने त्याच्या खांद्यावर बर्फाचा पॅक स्लिंग ठेवला. यानंतर त्याने नेटमध्ये भाग घेतला नाही आणि गोलंदाजीही केली नाही. या ऐच्छिक सराव सत्रात आलेला शार्दुल हा पहिला खेळाडू होता. भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ त्याला थ्रोडाउनचा सराव करत होते. यानंतर शार्दुल वेदनेने ओरडू लागला.

Comments
Add Comment

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे