Weight Loss: ब्लॅक टी की ग्रीन टी? काय आहे वेट लॉससाठी जास्त फायदेशीर

  100

मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक जण लठ्ठपणाने(obesity) त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे त्यांच्या रोजची कामे करण्यात अडचण येते तसेच आरोग्यावरही(health) दुष्परिणाम होतात. अशातच बरेचजण वजन कमी(weight loss) करण्यासाठी डाएटिंग आणि एक्सरसाईजचा पर्याय निवडतात. तसेच अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारची ड्रिंक पितात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील.


यातील सामान्यपणे केला जाणारा उपाय म्हणजे दुधाची चहा बंद करून ब्लॅक टी अथवा ग्रीन टी पिण्यास सुरूवात करतात. दरम्यान, अनेक लोकांमध्ये असा संभ्रम असतो की वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी प्यावी की ग्रीन टी प्यावी. अशातच हे जाणून घेणे गरजेचे असते की ब्लॅक टी की ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते जाणून घ्या...



तज्ञांच्या माहितीनुसार


ग्रीन टीमध्ये कॅटेकिन्स नावाचे कंपाऊंड असते जे मेटाबॉलिज्म वाढवून वजन घटवण्यास फायदेशीर ठरते. तर ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. ब्लॅक टीही फ्लॅव्हेनाईड्स आणि पॉलिफेनॉल्स सारखे अँटी ऑक्सि़डंट मोठ्या प्रमाणात असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्हीचे सेवन केल्याने लाभ मिळतो. मात्र वजन घटवण्याच्या बाबतीत ग्रीन टी अधिक फायदेशीर मानली जाते.



ग्रीन टी की ब्लॅक टी?


ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्हींपैकी ग्रीन टी वजन घटवण्यात अधिक फायदेशीर मानली जाते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट ईजीसीजी असते जे चरबी घटवण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये कॅटेकिन नावाचे कंपाऊंड भरपूर असते जे आपल्या चयापचयाचा दर वाढवतात आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. ग्रीन टी प्यायल्याने आपले पोट भरलेले राहते आणि यामुळे अधिक खाल्ले जात नाही. याउलट ब्लॅक टीमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि फॅट बर्निंग कंपाऊंड नसतात. यामुळे वजन घटवण्याच्या दृष्टीने ग्रीन टी ब्लॅक टीपेक्षा अधिक फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी