Accident : डंपरची धडक बसल्यावर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

भोपाळ: मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडक बसल्यानंतर एका बसला लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास गुना-आरोन रस्त्यावर झाली. यावेळेस उलट्या दिशेने येणाऱ्या डंपर ट्रकची प्रवाशांना नेणाऱ्या बसला टक्कर बसली. यानंतर बस पलटी झाली आणि यात आग लागली.

या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी आर्थिक मदतीचीही घोषणाकेली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले, गुना येथून आरोन जाणाऱ्या बसमध्ये भीषण आग लागल्याने प्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण काळात आमचे सरकार मृत कुटुंबियांच्या पाठीशी आहे. माझ्या संवेदना त्यांच्या प्रती आहेत.


 


तपासाचे आदेश


मुख्यमंत्री म्हणाले, मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवरील योग्य उपचार व्यवस्थेचे तसेच अपघाताप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. यामुळे भविष्यात होणाऱ्या अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.

मदतीची घोषणा


मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला बस अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४-४ लाख रूपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तर केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, घटनेची माहिती मिळताच मी लगेचच कलेक्टर आणि एसपी यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या