देशविरोधी काम करणाऱ्यांना माफी नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

नवी दिल्ली : मोदी सरकारची(modi government) भूमिका स्पष्ट असून देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. त्या व्यक्ती, संघटनांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.


केंद्र सरकारने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (उप्पा) ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटरवर कारवाईची माहिती दिली.


गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ला उप्पाअंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' घोषित करण्यात आले आहे. ‘ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे शहा यांनी म्हटले.

Comments
Add Comment

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी