लष्करांवर नागरिकांची मने जिंकण्याची जबाबदारी : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारतीय लष्करावर केवळ देशाला शत्रूंपासून बचाव करण्याची जबाबदारी नाही तर नागरिकांची मने जिंकण्याचीही जबाबदारी आहे. त्यामुळे पूंछमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्मूा-काश्मीरमधील राजौरी येथे जवानांशी संवाद साधताना बोलत होते.


जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह आज जम्मू -काश्मीर दौऱ्यावर आहेत. राजौरी येथे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही युद्ध जिंकू आणि दहशतवादाचा नायनाटही करू. सर्व नागरिकांची मने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करु याची आपण खात्री बाळगा. तुमच्या सर्वांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.”


जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद संपला पाहिजे. दहशतवादाचा नायनाट करण्याच्या वचनबद्धतेसह पुढे वाटचाल करा, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २१ डिसेंबर रोजी पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर २२ डिसेंबर रोजी भारतीय सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली होती. त्यावेळी ३ नागरिकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतांच्या नातेवाईकांची आज राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील