शिरुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अनेक खुलासे करत त्यांच्या शिरुर मतदारसंघात त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले. त्यांच्या या लगेचच्या दौर्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, हा दौरा पूर्वनियोजित होता, त्याचा कालच्या वक्तव्याशी काही संबंध नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार काल अमोल कोल्हे यांचं नाव न घेता म्हणाले होते की, त्यांचे चित्रपट चालत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत होता, ही गोष्ट त्यांनी आम्हाला बोलून दाखवली होती. त्यासाठी ते राजीनामा देणार होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं होतं. पण यावेळी आमचा उमेदवार उभा करुन त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं अजित पवार म्हणाले होते.
या वक्तव्यानंतर आज सकाळीच अजित पवार कोल्हेंच्या शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही’, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…