Uttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेल्या महिन्यात बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तब्बल १७ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले. यानंतर उत्तराखंडमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत अंगावर कोसळल्याने ६ मजुरांना जीव गमवावा लागला, तर ७ मजूर जखमी झाले आहेत.


उत्तराखंडच्या रुडकी येथे आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळली. त्यामध्ये, भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला व ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.


लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान, कच्च्या विटांची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली ८ ते १० कामगार दबले. स्थानिकांच्या व आजूबाजूच्या परिसरातील कामगारांच्या मदतीने तसेच जेसीबीच्या मदतीने विटा बाजूला सारुन कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी या मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू

India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात

Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि

Presidential Award : ऑपरेशन सिंदूर”सह विविध मोहिमांतील वीरांना सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात

Dada Bhuse : पुढीलवर्षीपासून 'टीईटी'सह सर्व परीक्षा ऑनलाइन

शिक्षण मंत्र्यांची घोषणा; पेपरफुटीनंतर खबरदारी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई : शिक्षक पात्रता