Urfi Javed : अरेच्चा! उर्फी सुधारली की काय?

नेहमीच नेटकऱ्यांच्या टीकेची शिकार होणाऱ्या उर्फी जावेदने केलं असं काही की...


उर्फीचं प्रेरणादायी कृत्य सगळ्यांनाच भावलं


मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच आपल्या फॅशनेबल कपड्यांसाठी (Fashionable clothes) चर्चेत असते. सेफ्टीपिन, फोटोज अशा काहीही वस्तू वापरुन तयार केलेले तसेच चित्रविचित्र आकारांचे कपडे घालून स्टाईल करण्यासाठी उर्फी प्रसिद्ध आहे. तिच्या या फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ती वादग्रस्तदेखील (Controversial) ठरली आहे. पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे उर्फीची एक चांगली बाजू एका गोष्टीच्या निमित्ताने समोर आली आहे. उर्फीने एक प्रेरणादायी कृत्य केलं आहे, ज्यामुळे नेटकरी टीकेऐवजी तिचं भरभरुन कौतुक करत आहेत.


मुंबईतील रेस्टोबार 'द नाइन्स' इथला उर्फी जावेदचा वेट्रेस (Waitress) बनल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये उर्फी वेटर बनून लोकांना प्रेमाने जेवण सर्व्ह करताना दिसतेय. याशिवाय ती लोकांसोबत आपुलकीने गप्पा मारतानाही दिसतेय. त्यामुळे ती वेटर का बनली होती? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण आज उर्फीने स्वतःच या व्हिडिओमागचं खरं कारण सांगितलं आहे.


उर्फीने इंस्टाग्रामवर (Instagram) ही खास गोष्ट उघड करताना सांगितलं की, तिने कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशनसाठी (Cancer Patients and association) निधी उभारण्यासाठी वेट्रेस होण्याचा निर्णय घेतला होता. उर्फी लिहिते, "स्वप्न साकार झालं! कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं. ते सर्व दृष्टीकोनावर अवलंबून असतं. मला काही तास वेट्रेस म्हणून काम करायचं होतं. कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनमध्ये निधी देण्यासाठी मी ही हक्काची कमाई केली." त्याचबरोबर ज्यांच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली त्यांचे उर्फीने कॅप्शनमध्ये आभार मानले आहेत.





अभिनेत्री उर्फी जावेदचे हे पाऊल अनेकांना प्रेरणा देणारे आहे. तिला या ख्रिसमसमध्ये काहीतरी अर्थपूर्ण करुन सिक्रेट सांता बनून लोकांना मदत करायची होती. तिने त्या रात्री हॉटेलमधल्या कर्मचार्‍यांशी खूप छान संवाद साधला. याशिवाय तिने काही टिप्स घेतल्या. या टिप्सचा वापर ती आता कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी करणार आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या