Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

WFIचा वाद काही थांबेना, न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही - पुनिया

WFIचा वाद काही थांबेना, न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही - पुनिया

नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटू(indian wrestler) आणि कुस्ती महासंघ(WFI)यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यातच रविवारी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक रद्द केली आणि नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले. सरकारचे म्हणणे आहे की ही निवडणूक नियमांच्या विरोधात आहे.


अध्यक्षपद निलंबित झाल्यानंतर संजय सिंहने म्हटले की ते याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलतील. न्यूज एजन्स एएनआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले, ज्या मुलांना हा खेळ खेळायचा आहे त्यांचे भविष्य बर्बाद होत आहे.



बृज भूषण सिंह यांनी दिले स्पष्टीकरण


घाईघाईत ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे खासदार बृज भूषण सिंह यांनी सांगितले की गोंडामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासाठी करण्यात आले होते कारण इतक कोणताही महासंघ इतक्या कमी वेळात स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहमत नव्हता.



न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही


फेडरेशन रद्द झाल्याबाबत बोलताना साक्षी मलिक म्हणाली, तिला मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, याबाबतचा लिखित आदेश मिळालेला नाही. यातच पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या बजरंग पुनियाने म्हटले की तो तोपर्यंत आपला पुरस्कार परत घेणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही.


याबाबत बजरंग पुनिया म्हणाला, मी पद्मश्री परत घेणार नाही. न्याय मिळाल्यानंतरच यावर विचार करेन. कोणताही पुरस्कार हा आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही.

Comments
Add Comment