मुंबईत पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू

मुंबई : ड्युटीवरून घरी जाताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर काळाने घाला घातला. गाडीवरून जाताना पतंगाचा मांजा गळ्याला लागल्याने गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


सुरेश जाधव हे दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते ड्युटी संपल्यानंतर घरी निघाले. वरळी येथे त्यांचे निवासस्थान आहे. सांताक्रूजमधील वाकोला ब्रिज या ठिकाणी आल्यानंतर मांजाने त्यांचा गळा चिरला. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.


याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यातून एक निवदेन जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आज रोजी दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई क्र 111615/ समीर सुरेश जाधव वय 37 वर्षे, रा ठी. बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम नं. 28, वरळी, मुंबई हे 15.30 वाजताचे सुमारास त्यांचे कर्तव्य पूर्ण करून मोटार सायकलवरून त्यांचे वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज, सांताक्रुज पुर्व याठिकाणी मांजाने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल 1 यांनी उपचार कामी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.


सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि राजेंद्र मुळीक यांनी 18.06 वाजता मोबाईल द्वारे दिली.

Comments
Add Comment

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :