पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका लागली कामाला

दोन महिन्यांत २ हजार कोटींचे आहे लक्ष्य


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५ - २६ मध्ये १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेचे या आर्थिक वर्षांत ७३०० कोटी रुपयांचे लक्ष्य आहे . त्यामुळे पुढील दोन महिन्यंमध्ये महापालिकेचे करनिर्धारण आणि संकलन विभाग हे लक्ष्य पूर्ण करते की यापेक्षा अधिक महसूल वसूल करतो याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.


महानगरपालिका कर निर्धारण व संकलन विभागाच्‍या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आढावा घेतला. महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडलेल्‍या या बैठकीस सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह संबंधित सर्व प्रशासकीय विभागातील करनिर्धारण व संकलन खात्‍याचे अधिकारी उपस्थित होते.


कर वसुलीसाठी ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत लघुसंदेश (एसएमएस), नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तातडीने मालमत्ता कर भरावा. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ता करधारकांनी ‘केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन या बैठकीत प्रशसनाच्यावतीने करण्यात आले आहे.


मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी,असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तथापि, कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार जप्ती व अटकावणीची कठोर कारवाई तात्काळ करण्यात यावी. सदर कारवाईमध्ये भूखंड, निवासी व व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे तसेच औद्योगिक गाळे यांचा समावेश करण्यात यावा,असेही निर्देश देण्यात आले आहे.


येत्या पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. .ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील, अशी प्रकरणे वगळून मालमत्‍ताकर थकविणा-या थकबाकीदारांविरोधात जप्‍ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू करावा. तसेच वाणिज्यिक थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करावी.


Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात