Nitesh Rane : सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाँकी है, संजय राऊत का अंदर जाना अभी बाकी है

आमदार नितेश राणे यांचा सणसणीत टोला


मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना आमदार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा देशद्रोही सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) नाचतानाचा व्हिडीओ दाखवल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. यात ही पार्टी भाजपच्या पदाधिकार्‍यानेच बोलावली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यावर 'सतत देशी दारु घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊतची सकाळची प्रेस', असा सणसणीत टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.


नितेश राणे म्हणाले, बाजूला उभ्या असलेल्या बडगुजरला आणखी खड्ड्यात टाकण्याचं काम संजय राजाराम राऊतने केलं आहे. आतापर्यंत बडगुजर बोलत होते की मी सलीम कुत्ताला ओळखतच नाही, मी त्या पार्टीमध्ये गेलोच नाही, ते फोटोग्राफ बदललेले आहेत. पण काल रात्री तर संजय राऊतने सांगून टाकलं की तो एक अपघात होता. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्विकारलं की ती पार्टी झाली होती, असा दावा नितेश राणे यांनी केला.


पुढे ते म्हणाले, संजय राऊत भाजपच्या पदाधिकार्‍याचा मोठेपणा करत फोटोग्राफ दाखवत होता. पण त्याने एक तरी पुरावा द्यावा, बिनपुराव्याने भुंकण्याचं काम तर तो नेहमीच करतो. आम्ही पुरावा दिला, व्हिडीओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले. आता ती पार्टी भाजपच्या पदाधिकार्‍याने बोलावली होती हे फोटोग्राफ दाखवून सिद्ध होणार नाही. मग तुझेही एका डॉक्टर महिलेसोबतचे फोटो आम्ही दाखवायचे का? तुझे आणि तिचे काय संबंध आहेत याबद्दल वेगळी माहिती देण्याचे प्रयत्न करायचे का? अशी टीका नितेश राणे यांनी केली.



थोडं शुद्धीत राहून इतिहास तपास


नितेश राणे म्हणाले, तुझे फोटोग्राफ दाखवण्याअगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेत दाखवून दिलं आहेस. गृहराज्यमंत्री पद शिवसेनेकडे कधीच नव्हतं म्हणून थोडं शुद्धीत राहून इतिहास तपास म्हणजे गृहमंत्रीपद कोणाकडे कधी होतं हे तुला नक्की कळेल. 'सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाँकी है, संजय राऊत का अंदर जाना अभी बाकी है' असं जळजळीत विधान नितेश राणे यांनी केलं.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास