उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आरक्षणप्रश्नी मराठा समाजाला लवकरच न्याय मिळणार आहे. या प्रश्नी दाखल क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालाय, क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. ही याचिका फेटाळेल असं म्हटलं जायचं. पण सुप्रीम कोर्ट हे ऐकणार आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे. २४ जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू, सर्वांनी शांतता राखावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात