Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळूनही हार्दिक पांड्याच्या वाट्याला आलं ‘हे दुखणं’!

Share

कसोटी मालिकेसह हार्दिक पांड्या खेळणार नाही आयपीएल?

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची नुकतीच आयपीएलसाठी (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी निवड करण्यात आली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. मागील पाच वर्षे कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) त्यांना पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहायचे होते. त्यामुळे हार्दिक पांड्यावर अनेक चाहत्यांनी टीकाही केल्या. मात्र, हार्दिक पांड्याच्या तब्येतीबाबत आता एक वेगळीच अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तो आयपीएल खेळणार नसल्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याला विश्वचषक (World Cup) सामन्यांच्या वेळी खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे दोन सामन्यांनंतर उर्वरित विश्वचषक सामने त्याला खेळता आले नाहीत. त्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत देखील खेळता आले नाही. यानंतर आता याच दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळू शकणार नसल्याचे समजत आहे.

हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. खुद्द जय शहा यांनी असा आशावाद बोलून दाखवला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकाच काय हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पांड्याने संघात वापसी केली होती. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

27 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago