ठाणे शहरात पत्नी, दोन मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेला आरोपी जेरबंद

ठाणे : कासारवडवली गाव येथील शिंगे चाळीत राहाणाऱ्या अमित धर्मवीर बागडी (२९) हा आपली पत्नी भावना (२४) आणि अंकुश (८) व खुशी (६) या दोन मुलांची हत्या करून पसार झाला होता. त्याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास काल जेरबंद करण्यात पोलीस शोध पथकास यश मिळाले आहे.


अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील व सपोआ (शोध -१) गुन्हे निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक ५ वागळे, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांचेकडील आठ पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. या तपास पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेतला असता हा आरोपी हरयाणात पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व पोउपनिरी तुषार माने यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती.


गेलेल्या तपास पथकांनी आरोपीस हिसार, राज्य-हरयाणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन ठाणे येथे आणले. त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले की, त्याची बायको दोन मुलांना घेऊन आपल्या भावासोबत ठाणे येथे पळून आली होती. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चिडून बॅटने मारून बायको व मुलांचा खून केला. त्याला आपल्या भावालाही मारायचे होते पण ते त्याला जमले नाही आणि तो तेथून पसारा झाला. या आरोपीला दारूचे व्यसन असून तो बिल्डिंग बांधकामामध्ये बिगारीचे काम करत होता.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक

Nashik : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण, दानिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिक : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. बळजबरी मांस

Nashik : अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ? भोंदू खरातची रवानगी आता...

नाशिक : स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला पुरुष भासवून कोणाचे आर्थिक शोषण तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू

Raja Shivaji : राजा शिवाजी मधील अफझलखानाची भेट आणि जोरदार टीकास्त्र; रितेशने नेमकं दाखवलं आहे तरी काय ?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु