सोलापूर : गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे एसटी बस (ST Bus) आणि दुचाकीचा (Bike) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या एसटी बसचा आणि धाराशिवहून बार्शीकडे निघालेल्या दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. यातील दुचाकीवर धाराशिवमधील तीन मित्र होते. एसटी बस आणि दुचाकीची झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तीनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले.
कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. दरम्यान, बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…