Oscar 2024 : यंदा भारताची ऑस्करवारी नाही!

ऑस्कर शॉर्टलिस्टेड मधून भारताचा '२०१८' चित्रपट बाहेर...


मुंबई : सिनेसृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर (Oscar awards). हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी अनेक चित्रपट निर्मात्यांची महत्त्वाकांक्षा असते. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत खडतर आहे. यंदाच्या वर्षी या ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारण्यासाठी भारताने ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ (2018 Everyone is a hero) या मल्याळम चित्रपटाची निवड केली होती. मात्र, ऑस्कर २०२४ साठी (Oscar 2024) शॉर्टलिस्ट (Shortlist) झालेल्या चित्रपटांमध्ये भारताचे नाव नाही. त्यामुळे यंदा भारत ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.


केवळ १२ कोटींच्या बजेटमध्ये उभ्या राहिलेल्या मात्र बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या वर कमाई करणाऱ्या ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ (2018 Everyone is a hero) या चित्रपटाची भारताने ऑस्करसाठी निवड केली होती. हा चित्रपट ९६ व्या अकादमी पुरस्कारांसाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत पाठवण्यात आला होता. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आज ऑस्कर २०२४ साठी चित्रपटांची शॉर्टलिस्ट यादी जाहीर केली. यामध्ये मल्याळम चित्रपट '२०१८'चे नाव नाही. त्यामुळे भारतीयांची निराशा झाली आहे.


अकादमीने मूळ गाणे, डॉक्युमेंटरी फीचर, इंटरनॅशनल फीचर, ओरिजिनल स्कोअर यासह १० श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या १५ चित्रपटांची घोषणा केली आहे. जगभरातील एकूण ८८ चित्रपटांतून हे १५ चित्रपट निवडण्यात आले आहेत. यात अर्मेनिया, भूतान, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आईसलँड, इटली, जपान, मेक्सिको, मोरोक्को, स्पेन, ट्युनिशिया, युक्रेन, युके यांचा समावेश आहे. मात्र, यात भारताचे नाव नाही.



'२०१८' चे दिग्दर्शक ज्युड अँथनी जोसेफ झाले निराश


ऑस्करच्या शर्यतीतून चित्रपट बाहेर पडल्यानंतर '२०१८' चे दिग्दर्शक ज्युड अँथनी जोसेफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निराशा व्यक्त केली. शॉर्टलिस्ट केलेल्या १५ चित्रपटांचा स्क्रीनशॉट शेअर करत जोसेफ यांनी आतापर्यंतच्या प्रवासात त्यांना साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसंच निवड झालेल्या चित्रपटांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'ऑस्करची वाट पाहत आजपासून पुढच्या स्वप्नाची सुरुवात होत आहे आणि ऑस्कर मिळेपर्यंत मी इथेच राहणार आहे', अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.





कसा आहे ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’?


‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ हा अँथनी जोसेफ दिग्दर्शित चित्रपट ५ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंतच्या मल्याळम चित्रपटांमध्ये ‘२०१८ एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई केली आहे.


हा चित्रपट २०१८ साली आलेल्या केरळ पुरावर आधारित आहे. केरळच्या महापुराने राज्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. या भीषण नैसर्गिक आपत्तीला लोक कसे धैर्याने तोंड देतात याची कहाणी या चित्रपटात अतिशय सुरेखपणे मांडण्यात आली आहे. पुरासारख्या समस्येवर मात करणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या