
नाशिक : सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या माध्यमातून नंदुरबार ते मुंबई मंत्रालय असा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी पायी बिराट मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा ७ डिसेंबर २०२३ पासून नंदुरबार या ठिकाणाहून पायी निघाला. मोर्चाचे आयोजन जरी राजकीय हेतून झाले असले तरी त्यामध्ये सहभागी असलेला जनजाती समूहाची सेवा करण्याच्या हेतूने १७ डिसेंबर रोजी हा मोर्चा आडगाव नाशिक येथे आला. या मोर्चातील पायी चालणाऱ्या जनजाती बांधवांची प्रकृती खराब झाली. असे समजतात राष्ट्रीय विकास मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद व्यासपीठ व अनामिक या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळेस ४ हजार पेक्षा जास्त जनजाती बांधवांची आरोग्य तपासणी केली. त्यांना गोळ्या, औषधे व जखमेवर मलम पट्टी करण्यात आली.यावेळी- योगेश शिंदे, सह प्रमुख अनिल पाटील, अनामिक चे महेंद्र भोये, विजय रणपीसे, अनुलोम चे दत्ता मिसाळ, अमोल गायकवाड व आयुर्वेद सेवासंघ चे डॉ. रश्मी भुरे, डॉ. सोनल ठाकरे, शुभदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.