Salim Kutta case : बडगुजरांचा गॉडफादर भांडुपचा संजय राऊत!

आमदार भरत गोगावले यांचा दावा


नागपूर : भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी देशद्रोही सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर नाचत असलेला व्हिडीओ शेअर केला आणि खळबळ उडवून दिली. या प्रकरणी आज सलग चौथ्या दिवशी बडगुजर यांची एसीबीमार्फत (ACB) चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक महत्त्वाचा दावा केला. 'बडगुजरांचा गॉडफादर भांडुपचे संजय राऊत आहेत', असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


भरत गोगावले म्हणाले, 'या प्रकरणाचे धागेदोरे भांडुप कांजुरमार्गच्या जवळ जातील. याचं कारण म्हणजे कोणाचा कोणीतरी पाठीराखा असतो, त्याप्रमाणे बडगुजरांच्या मागे संजय राऊत दिसतायत. चौकशीअंती हे स्पष्ट होईलच. त्यात राऊतांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी होईलच. त्यांना १०० टक्के याबद्दल माहित होतं, त्याशिवाय हे घडूच शकणार नाही. बडगुजरांना पाठीशी घातलं गेलंय कारण त्याशिवाय एवढं कोणी बोलू शकत नाही किंवा नाचू शकत नाही' असा दावा त्यांनी केला आहे.


दरम्यान, सुधाकर बडगुजर यांचे दोन साथीदार बडगुजर अँड कंपनीचे भागीदार साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांचीदेखील एसीबी चौकशी करणार आहे. एसीबीकडून झाडाझडतीही केली गेली आहे आणि त्यात काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली गेली आहेत. पदाचा गैरवापर करत पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना