Nitesh Rane : काँग्रेस का हाथ दहशतवादियों के साथ

Share

दाऊद इब्राहिम हा काँग्रेसचा जावई

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

नागपूर : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सलीम कुत्ताचा (Salim Kutta) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासोबत नाचतानाचा व्हिडीओ शेअर करुन खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या झाली, असा दावा केला. यावर नितेश राणे यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलताना भाष्य केले. ‘काँग्रेस नेत्यांना दहशतवाद्यांची एवढी माहिती येतेच कुठून?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोरंट्याल यांच्या एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली. तसेच मालेगाव येथे हिंदूंच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्याची मागणी केली असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

नितेश राणे म्हणाले, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना कसं माहित की सलीम कुत्ता मेलेला आहे? दाऊदच्या लोकांबद्दल या संबंधित आमदाराला काय माहित आहे? १९९३च्या बॉम्बस्फोटनंतर एका समितीचा रिपोर्ट आला होता. काँग्रेसचे नेते आणि दाऊदच्या (Dawood Ibrahim) संबंधित तो रिपोर्ट होता. माझी अशी मागणी आहे की, या संबंधित आमदारांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. त्यांना कसं माहित की कुत्ता जीवंत आहे? कारण माझ्या माहितीनुसार पोलीस सलीम कुत्ताची काही दिवसांनी जेलमध्ये चौकशी देखील करायला जाणार आहेत. पण या काँग्रेस आमदाराला काय माहित आहे? त्याला कोणाचे फोन आले? मग उद्या दाऊदशी काँग्रेसच्या नेत्यांच्या संबंधांबाबत आम्ही जे काही ऐकलं होतं, त्याच्यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

दाऊदच्या साथीदारांनी १९९३ च्या बॉम्बब्लास्टमध्ये २५७ निरपराध मुंबईकरांना मारलं. त्यात काँग्रेसचा मेला की भाजपचा हे कोणीही बघितलं नाही. त्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडवून टाकलं. मग याच्यात राजकारण आणि वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात? म्हणून माझा मुद्दा असा आहे की, यात राजकारण न करता आम्ही जे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले, जी पार्टी सार्वजनिक पण नाही तर थेट बडगुजरच्या फार्म हाऊसवर बोलवण्यात आली होती. स्वतःच्या घरात पार्टी म्हटल्यावर ज्या लोकांना आमंत्रण दिलं तीच लोकं आली, हेच खरं आहे. म्हणजेच काँग्रेस का हाथ दहशतवादियों के साथ आहे. दाऊद इब्राहिम हा काँग्रेसचा जावई आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. मग संबंधित आमदारांनी हेही सांगावं की दाऊद मेला आहे की जीवंत आहे? त्यांच्या घरातल्या घरगड्यांप्रमाणे काँग्रेसचे नेते झाले आहेत, मग त्यांनी सांगावं की त्याच्यावर विषप्रयोग झाला आहे की नाही?, असं नितेश राणे म्हणाले.

दहशतवाद्यांची माहिती येतेच कुठून?

अशा एका दहशतवाद्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी, याची खरंतर चौकशी झाली पाहिजे. त्यांना जर इतकंच बोलायचं असेल तर त्यांनी सभागृहात आमच्यासमोर हा विषय मांडावा, इथे येऊन पत्रकारांसमोर नुसतं बोलायचं नाही. मैदानात आल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारु की त्यांच्याकडे एवढी दहशतवाद्यांची माहिती येतेच कुठून? दाऊदच्या घरी चहा पाजण्यासाठी असतात का हे लोक?, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी मोर्चे काढले नाहीत तर…

मोर्चे काढले नाहीत तर उद्धव ठाकरेचं दिल्लीचं प्रायव्हेट फ्लाईट कसं उडणार? त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे होतील, गाडीचं पेट्रोल आणि हप्ते कोण भरणार? मुलाला स्वेटर कोण घालणार? आता ३१ डिसेंबर पण येतंय मग पार्टीचे पैसे कोण भरणार? एवढा खर्च त्यांना काढायचा असतो, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या धारावी प्रकल्पाविरोधातील मोर्च्याची खिल्ली उडवली.

मालेगावमध्ये पोलीस मुख्यालयाची मागणी

हिंदू धोक्यात आहे म्हणून मालेगावमध्ये आम्ही पोलीस मुख्यालयाची मागणी करत आहोत. तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तिथे असलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी फार वाढली आहे. त्यामुळे हिंदूला वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. हे मविआचं सरकार नव्हे, महायुतीचं आणि हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही हक्काने हिंदूंच्या संरक्षणासाठी पोलीस मुख्यालय मागत आहोत, असं नितेश राणे म्हणाले.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

35 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

36 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

43 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

47 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

56 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

59 minutes ago