Delhi:दिल्ली दारू घोटाळा, अरविंद केजरीवालना ED ने पुन्हा पाठवली नोटीस

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २१ डिसेंबरला सादर होण्याचे आदेश दिले आहेत.


याआधी २ नोव्हेंबरला अरविंद केजरीवालला चौकशीसाठी ईडीने नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस बेकायदेशीर सांगत परत घेण्याची मागणी केली होती. केजरीवाल या दिवशी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी रोड शोमध्ये सामील झाले होते.



विपश्यना ध्यानमध्ये सामील होण्याचा कार्यक्रम


अरविंद केजरीवाल यांना समन्स अशा वेळेस पाठवण्यात आले आहे जेव्हा ते विपश्यना केंद्रात जाणार आहेत. न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की केजरीवाल १० दिवसांच्या विपश्यना ध्यान कार्यक्रमात सामील होतील.


अधिकाऱ्यांनी सांगितले की केजरीवाल दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रीय राजधानीसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री दीर्घकाळापासून विपश्यनेचा अभ्यास करत आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून बंगळुरू आणि जयपूरसह अनेक ठिकाणी गेले आहेत.



कोणत्या आप नेत्यांना आजपर्यंत अटक?


मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह न्यायालयीन कोठडीत आहेत.

Comments
Add Comment

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी