Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीNagpur Blast : नागपुरात भीषण स्फोट, ९ लोकांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची...

Nagpur Blast : नागपुरात भीषण स्फोट, ९ लोकांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नागपूर : नागपुरातील बाजारगाव येथील सोलार कंपनी ‘एक्सप्लोसिव्ह’मध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास मोठा स्फोट (Nagpur Blast) झाला. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाली आहे. स्फोटात एकूण ९ लोकांचा मृत्यू तर ३ जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.

या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याचे समजत आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी दिली.

सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे. ‘एक्सप्लोसिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -