IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिकादरम्यान आजपासून वनडे मालिकेला सुरूवात

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने सर्वात आधी टी-२० मालिका खेळली. यात ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. अखेरीस २ सामन्यांची कसोटी मालिका रंगेल.


आज भारत आणि दक्षिण आफ्रिका याच्यात मालिकेतील पहिला वनडे सामना जोहान्सबर्गच्या द वांडरर्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतासाठी टी-२०मध्ये सूर्यकुमार यादवने नेतृत्व केले होते. मात्र वनडे मालिकेसाठी संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.


टीम इंडियाच्या निवड समितीने व्हाईट बॉल सीरिजसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला निवडलेले नाही. जाणून घेऊया दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग ११


भारतीय संघाचे प्लेईंग ११


टीम इंडिया: रजत पाटीदार, साई सुदर्शन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, केएल राहुल(कर्णधार), रिंकू सिंह, अक्षऱ पटेल, आवेश कान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, आकाश दीप.


टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला ताप आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात तो खेळणार नाही. त्याच्याशिवाय दीपक चाहरही मेडिकल इर्मजन्समुळे घरी परतला आहे. त्यामुळे संभाव्य प्लेईंग ११ असी असू शकते.


रजत पाटीदार, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, अवेश खान


दक्षिण आफ्रिकेचे प्लेईंग ११


दक्षिण आफ्रिका संघ - रीज़ा हेंड्रिक्स, टोनी डी ज़ोरज़ी, रासी वॅन डेर डुसेन, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नंद्रे बर्गर, तबरेज़ शम्सी, लिज़ाद विलियम्स, वियान मुल्डर, ओटनील बार्टमॅन, मिहलाली मपोंगवाना , काइल वेरिन



दक्षिण आफ्रिका प्लेईंग ११ - रीज़ा हेंड्रिक्स, टोनी डी ज़ोरज़ी, रासी वॅन डेर डुसेन, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नंद्रे बर्गर, लिजाड विलियम्स.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट