Fruits: ही फळे रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर, शरीराला मिळतात दुप्पट फायदे

मुंबई: शरीरास पोषण देण्याच्या बाबतीत फळाला कोणताच पर्याय नाही. फळे शरीराला विविध प्रकारची व्हिटामिन्स देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. असे यासाठी कारण रिकामे पोट अधिक प्रमाणात पोषकतत्वे शोषून घेते. त्याचवेळेस आपली पाचनसंस्था अन्य खाद्य पदार्थांसोबत स्पर्धा करत नसते. अशातच आम्ही तुम्हाला अशा सात फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने अधिकाधिक लाभ मिळू शकतात.



पपई


पपईमध्ये पपेन आणि कायमोपॅपेनसारखे एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतात. हे एन्झाईम पचनशक्ती सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी जबाबदार आहेत. जेव्हा पपईचे रिकाम्या पोटी सेवन केले जाते तेव्हा पपईमधील व्हिटामिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात शरीरात शोषले जातात.



टरबूज


जर तुम्ही सकाळी उठल्यावर टरबूज खात असाल तर संपूर्ण रात्रभरानंतर हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कारण यात ९२ टक्के पाणी असते. यात लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट असते.



ब्लू बेरी


सकाळी सकाळी जर गोड खायची इच्छा झाली तर ब्लू बेरी खा. यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेंदूला उर्जा मिळते. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते.



केळी


सकाळी सकाळी केळी खाल्ल्याने शरीरास भरपूर उर्जा मिळते. यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते.



अननस


अननस रिकाम्या पोटी खाण्यासाठी चांगले फळ आहे. यात व्हिटामिन सी आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. तसेच हाडेही मजबूत होतात.



सफरचंद


दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतात ही म्हण खरी आहे. जेव्हा रिकाम्या पोटी सफरचंद खातो तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.



किवी


किवी भले छोटे फळ आहे मात्र हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Comments
Add Comment

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्बची धमकी! पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याची माहिती समोर आली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए

iPhone 17 Pro साठी फ्रीस्टाइल हाणामारी, BKC मध्ये राडा

iPhone 17 Pro: अ‍ॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या विक्रीला आजपासून

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात