Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध कोणाचा?

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध कोणाचा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नावच सांगितले


नागपूर : मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्यास कोणाकोणाचा विरोध आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचे खळबळजनक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी समाजाला झुलवत ठेवले, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे.



मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते न्यायालयात टिकवून दाखवले. आपले सरकार असेपर्यंत ते आरक्षण टिकले आणि सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली, अशी माहिती फडणवीस यांनी भाजपच्या नागपूर येथील बैठकीत बोलताना दिली.


ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते, असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

Comments
Add Comment