Shreyas Talpade : आजारपणामुळे 'वेलकम ३' मधून आऊट होणार श्रेयस तळपदे?

काय म्हणाली सिनेमाची टीम?


मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि मराठीतील (Marathi) प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) परवा रात्री हृदयविकाराचा झटका (Heart attack)आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्‍या भागाचे शूटिंग करुन घरी परतल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तपासणीनंतर त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं समजलं. सध्या त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्याला लवकरच डिस्चार्जही मिळणार आहे.


श्रेयसची प्रकृती आता ठीक असली तरी त्याला आरामाची गरज आहे. त्याच्या आजारपणामुळे शूटिंगच्या शेड्युलवर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यामुळे तो आता 'वेलकम ३' चा भाग असणार की नाही अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता याबाबत शंका दूर झाल्या आहेत.


'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं शूटिंग ठरलेल्या वेळेतच होणार आहे. या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या खूप चिंतेत आहे. काहीही झालं तरी 'शो मस्ट शो गॉन' असं म्हटलं जात आहे. कोणत्याही कारणाने सिनेमाचं शूटिंग थांबणार नाही. श्रेयसची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला एकदम फिट वाटेल तेव्हाच त्याचे सीन शूट होतील", असं सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.


'वेलकम ३' या सिनेमाचं शूटिंग नाताळमध्ये शेड्यूल करण्यात आलं होतं. जगभरातील लोक या काळात सुट्टीवर असतात. याच गोष्टीची दखल घेत नाताळात या सिनेमाचं शूटिंग आयोजित करण्यात आलं होतं. शूटिंग संपल्यानंतर प्रत्येक जण सुट्टी आनंदात घालवू शकेल हा यामागचा हेतू होता. नव्या वर्षातही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.


'वेलकम टू द जंगल' या सिनेमात अक्षय कुमार, संजय दत्त, दिशा पटानी, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, अरशद वारसी आणि रवीना टंडन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे