मुंबई (प्रतिनिधी) : सिड्नहॅम महाविद्यालयात गुरुवारी ‘जल्लोष २०२३’ उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी वाङमय मंडळ प्रस्तूत या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘जल्लोष’ हा फक्त एक महाविद्यालयीन महोत्सव नसून एक सोहळा वा सणांच्या रूपात दरवर्षी साजरा होतो. यंदाचा हा महोत्सव ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या विषयाशी निगडित होता. या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक दैनिक प्रहार होते.
महोत्सवानिमित्त सिड्नहॅम महाविद्यालयातर्फे सालाप्रमाणे या वर्षीही जल्लोषात तयारी करण्यात आली होती. सिड्नहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याची तयारी करण्यात आली. यंदाचे मराठी वाङमय मंडळाचे प्रभारी प्राध्यापक राजेंद्र माळी यांचेही खूप मोलाचे सहकार्य सोहळ्यास लाभले.
जल्लोषचे या वर्षीचे अध्यक्ष ओमकार बावकर, साईराज जोशी आणि त्यांच्या संपूर्ण जल्लोष संघाने या कार्यक्रमासाठी जवळपास दोन महिने मेहनत घेतली. सिड्नहॅमच्या प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार हा ‘जल्लोष’ यंदा आंतरमहाविद्यालयीन न ठेवता सिड्नहॅमच्याच विद्यार्थ्यांसाठी आर्वजून ठेवण्यात आला.
तरूणाईचा ‘जल्लोष’ म्हणून दिमाखात मिरवणाऱ्या या ‘जल्लोष’ने या वर्षी लावणी, लिप्पण कला, रिलगाडी, चित्रहार यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मराठी संस्कृतीची जपणूक आणि संपन्न वारसा पुढे नेण्याचे काम ‘जल्लोष’ने नेहमीच केले आहे. लावणीच्या कलेला तरूण पिढीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही परंपरा जपण्यासाठी ‘जल्लोष’मध्ये खासकरून फक्त लावणीवर आधारित स्पर्धा नित्यनेमाने दरवर्षी आयोजित केली जाते. एखाद्या महाविद्यालयीन महोत्सवामध्ये केवळ लावणीसाठी खास स्पर्धा असणे, हे काम जल्लोषव्यतिरिक्त अन्य कोणतेही महाविद्यालय कदाचित करू शकत नसेल.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…