Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

मध्यरात्री उशीरापर्यंत चालणा-या पुण्यातील दहा हॉटेल्स आणि पबवर कारवाई

मध्यरात्री उशीरापर्यंत चालणा-या पुण्यातील दहा हॉटेल्स आणि पबवर कारवाई

पुणे : पुणे शहरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या तब्बल १० नामांकित हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली.


पुणे शहरात रात्री दीड वाजल्यानंतर देखील 'आफ्टर पार्टीज' सुरु असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील हॉटेल, पब, बारमध्ये उशीरापर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.


रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली.


पुण्यात रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या प्लंज, कोरेगाव पार्क, लोकल गॅस्ट्रो बार, एलरो, युनिकॉर्न, आर्यन बार, बालेवाडी, नारंग वेंचर, हॉटेल मेट्रो, लेमन ग्रास, विमाननगर, बॉलर, हॉटेल काकाज या दहा हॉटेल आणि पबवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment