Monday, July 22, 2024
Homeदेश'PoK भारताचा भाग आहे, कोणीही एक इंच जमीन घेऊ शकत नाही, संसदेत...

‘PoK भारताचा भाग आहे, कोणीही एक इंच जमीन घेऊ शकत नाही, संसदेत कलम ३७०वर म्हणाले अमित शाह

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी कलम ३७०वर बोलताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस आजही कलम ३७० हटवणे आजही चुकीचे म्हणत आहेत.तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही योग्य वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्या जाण्याबद्दल मोदी सरकारचा निर्णय वैध मानला आहे.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी याबाबतचा निर्णय ऐकवताना सांगितले, जम्मू-काश्मीरकडे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर आंतरिक संप्रभुतेचा अधिकार नाही. कलम ३७० हे एक अस्थायी प्रावधान होते.

अमित शाहने राज्यसभेत सांगितले की जम्मू-काश्मीरच्या लोकांना अधिकार मिळण्यापासून ३ कुटुंबांनी रोखले. PoK भारताचा आहे ते कोणीच हिरावू शकत नही. सोबतच भारचाटी एत इंच जमीनही जाऊ देणार नाही.

नेहरूंबाबत बोलताना शाह म्हणाले, नेहरूं अर्धा काश्मीर सोडून आले होते. नेहरूंच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर झाला.

कलम ३७०चा निर्णय इतिहास लक्षात ठेवेल

अमित शाहने काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले, काँग्रेसने कधीच कोणत्या चांगल्या कामाचे समर्थन केलेले नाही. गृहमंत्री म्हणाले की जम्मू-काश्मीरमध्ये जे तरूण कधीकाळी दगड घेऊन फिरत होते त्यांच्या हातात आमच्या सरकारने लॅपटॉप दिला आहे. आम्ही निर्णय घेऊ शकतो पळू शकत नाही. कलम ३७० निर्णय इतिहास नक्कीच लक्षात ठेवेल

दहशतवाद्यांना कोणतीच दया नाही

अमित शाह म्हणाले, आमच्या मनात दहशतवाद्यांबद्दल कोणतीही भावना नाही. त्यांनी हत्यारे टाकावीत आणि मुख्य प्रवाहात यावे. कलम ३७० रद्दबातल झाल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -