मुंबई: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यातील डर्बनमध्ये होणारा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर पहिल्या टी-२०मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. आता अशी माहिती समोर आली आहे की दीपक पूर्ण टी-२० शिवाय वनडे मालिकाही मिस करू शकतो. दीपकला टी-२० आणि वनडे मालिकेत भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते.
वडिलांच्या अचानक आजारपणामुेळे त्याने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला न खेळण्याचे ठरवले होते. मात्र आता टेलिग्राफ इंडियाच्या माहितीनुसार दीपक वनडे मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकने आतापर्यंत डर्बनमध्ये टीम इंडियाला जॉईन केलेले नाही. कारण त्याच्या कुटुंबियांसाठी ब्रेक घेतला होतो. वडिलांची स्थिती कशी यावर तो संघात जॉईन होणार की नाही हे ठरवणार आहे.
दीपकने ५ डिसेंबरला स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले होते की त्याचे वडील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण तो आज जोपण आहे ते त्याच्या वडिलांमुळेच. त्यांना अशा स्थितीत सोडून जाणे शक्य नाही. आपल्या वडिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले नाहीतर काहीही घडू शकले असते. दरम्यान, चहरच्या वडिलांच्या तब्येतीवर त्याचे संघात खेळणे अवलंबून आहे.
दीपकने आतापर्यंत टीम इंडियासाठी १३ वनडे आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये दीपकने अनेक दुखापतींचा सामना केला. यामुळे अनेकदा त्याला संघाबाहेर राहावे लागले. त्याने १३ वनडे सामन्यात ३०.५६चया सरासरीने १६ विकेट आणि २५ टी-२० सामन्यात २४.०९च्या सरासरीने ३१ विकेट आपल्या नावे केले आहेत.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…