मुंबई : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) देण्याची प्रक्रिया करत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) दौरे करत राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. पण हे करत असताना मराठा बांधवांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम ते करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वाटेल तसे आरोप ते करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. फडणवीसांविरोधात बोलणार्या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ती कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय? तुमची भाषणं कोण लिहून देतंय? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय? याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढावी लागेल.
मराठा आरक्षणाबद्दल बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागतच करु पण ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या, त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…