नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार (Global Leader approval Rating) , नरेंद्र मोदी यांना तब्बल ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे.
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेझ मॅन्युअल, तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. ही रेटिंग वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते.
तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते. या रेटिंगमध्ये टॉप ७ मध्ये ना अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचे नाव आहे, ना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नाव आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही आलेल्या रँकिंग मध्ये मोदी लोकप्रिय नेते ठरले होते.
मॉर्निंग कन्सल्ट या सल्लागार कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, पीएम नरेंद्र मोदी यांनी ७६ टक्के रेटिंगसह जगातील आपले स्थान अबाधित ठेवले आहे. तेव्हाही दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती एलेन बर्सेटच होते. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाय डेन यांना लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकातही स्थान मिळवता आलेले नाही. सदर सर्व्हे अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कंसल्टने केला होता.