ही आहे जबरदस्त ऑफर, या कारवर मिळतोय तब्बल ११.८५ लाखांचा डिस्काऊंट!

मुंबई: दरवर्षाच्या शेवटच्या महिन्यात गाड्यांचा स्टॉक संपवण्यासाठी कंपन्या डिस्काऊंट देण्यास सुरूवात करतात. या वर्षातही शेवटचा महिना डिसेंबरमध्ये काही मोजक्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला जात आहे. यात मारूती, ह्युंडाई, स्कोडा, फोक्सवॅगन आणि सिट्रोनसह अनेक कारचा समावेश आहे.


तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात तर वर्षाच्या अखेरीस आलेल्या या डिस्काऊंटचा फायदा उचलू शकता.जाणून घेऊया कोणत्या कारवर किती मिळत आहे डिस्काऊंट



Maruti Suzuki Zimny


मारुतीच्या जिम्नीवर १ लाखापर्यंतचा डिस्काऊंट दिली जात आहे. मारुती जिम्नी सक्षम ऑफ रोड एसयूव्ही आहे याला महिंद्राच्या थारला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरवले. ही एसयूव्ही १.५ लीटरच्या के सीरिज इंजिनमध्ये येते. भारताता जिम्नीच्या एक्स शोरूमची किंमत १२.७४ लाख रूपयांपासून सुरू होत १५.०५ लाख रूपयांपर्यंत आहे.



Hyundai Grand i10 Nios


होंडा सिटी हायब्रिडला कंपनी पहिल्यांदा एक लाख रूपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. हुंडाई वरना आणि स्कोडा स्लावियाला टक्कर देणाऱ्या सिटी हायब्रिडची किंमत १८.८९ लाख रूपयांपासून सुरू होते.



Skoda Slavia


स्कोडा स्लाविया भारतात कंपनीच्या बजेट कॉम्पॅक्टर सेडान आहे. आपली डिझाईन आणि जबरदस्त परफॉर्मन्समुळे ही सेडान खूप प्रसिद्ध आहे. स्कोडा स्लावियावर ग्राहक या महिन्याक १.५ लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळवू शकतात. ही कार १.० लीटर आणि १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते.



Volkswagen Tiguan


फोक्सवॅगन टिगुआन इयर एंड ऑफर अंतर्गत १.९ लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंटमध्ये मिळू शकते. भारतीय मार्केटमध्ये या गाडीची किंमत ३५.१७ लाखांपासून सुरू आहे.



Jeep Grand Cherokee


जीप ग्रँड चेरोकी या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बंपर डिस्काऊंटला विकली जात आहे. कंपनी या एसयूव्हीवर तब्बल ११.८५ लाख रूपयांपर्यंत ऑफर्स देत आहे. भारतात जीप ग्रँड चेरोकीची किंमत ८०.५० लाख रूपयांपासून सुरू होते.

Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या