Gautam Adani : गौतम अदानी पुन्हा जागतिक श्रीमंतांच्या यादीत 'टॉप २०' मध्ये!

गेल्या २४ तासांची कमाई इलॉन मस्कच्या कमाईपेक्षाही अधिक


मुंबई : मागील काही दिवस भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी चांगले ठरले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चबाबत (Hindenberg Research) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निरीक्षणानंतर अदानी समूहाच्या शेअर्सनी (Shares) उंच भरारी घेतली. हिंडेनबर्गच्या अहवालात तथ्य नसल्याचा दावा सुप्रीम कोर्टाने नोंदवला. परिणामी अदानींच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती ठरले आहेत.


अदानी समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत मंगळवारी एकाच दिवसात १२.३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १०,२५,४०,१८,००,००० रुपयांची वाढ झाली. अदानींच्या एका दिवसातील कमाईचा हा आकडा इलॉन मस्कपासून बर्नार्ड अर्नॉल्टपर्यंतच्या टॉप-३ अब्जाधीशांच्या कमाईपेक्षा जास्त आहे. अदानी एका दिवसात सर्वाधिक कमाईच्या बाबतीत नंबर एक अब्जाधीश बनले आहेत.


हिंडेनबर्गच्या अहवालानंतर झालेल्या नुकसानीमुळे गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप २० यादीतून बाहेर पडले होते. पण आता त्यांच्या संपत्तीच्या वाढीमुळे ते जगातील १५ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७०.३ अब्ज डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सध्या गौतम अदानी यांच्यापेक्षा दोन स्थानांनी पुढे आहेत. या यादीत मुकेश अंबानी ९०.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १३ व्या स्थानावर आहेत.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना