Fighter : अ‍ॅनिमल का बाप अनिल कपूर पुन्हा ऍक्शन करण्यासाठी सज्ज!

कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत 'फाइटर' मधून झळकणार!


मुंबई : अनिल कपूरचा 'फायटर' चा लूक प्रेक्षकांच्या भेटीला अ‍ॅनिमलने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडला आणि चित्रपट ५०० कोटींच्या क्लबच्या मध्ये सामील झाला आहे. मेगास्टार आणि 'बॉलिवुडचा बाप' अनिल कपूर सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये आणखी एका वेगळ्या भूमिकेसह प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. 'नाईट मॅनेजर' अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रॉकी उर्फ ​​ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंग या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारं दमदार पोस्टर पोस्ट केलं आहे.


अनिल कपूर सध्या जोरदार चर्चेत असून जुग जुग जीयो, द नाईट मॅनेजर आणि आता अ‍ॅनिमलच्या सध्याच्या मोठ्या यशासह हा 'अनिमल का बाप' त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे.





फायटरमधील रॉकीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तो तयार होत आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून आणि त्याचे प्रोडक्शन हाऊस, मार्फ्लिक्स पिक्चर्स निर्मित आहे. अनिल कपूर व्यतिरिक्त यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत हा चित्रपट २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

नोराच्या 'सरके चुनर'वर कंगना रणौत यांची परखड टीका; हे गाणे सर्व मर्यादा ओलांडत...

मुंबई: रॅपर बादशाहच्या 'तेत्तिरी' गाण्यानंतर आता नोरा फतेही आणि संजय दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे वादात

शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'

मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित

'धुरंधर २' ला २१ कट्स, 'ए' प्रमाणपत्र; जाणून घ्या चित्रपटाची लांबी आणि बदल

मुंबई: रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.