Saturday, June 21, 2025

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन गटांत गोळीबार, १३ जणांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन गटांत गोळीबार, १३ जणांचा मृत्यू

इंफाळ: मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या गोळीबारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना सोमवारी दुपारी लीथू गावात घडली.


म्यानमारच्या दिशेने जाणाऱ्या या गटावर परिसरातील एका गटाने जोरदार हल्ला केला. घटनास्थळी सुरक्षादलाला १३ जणांचे मृतदेह सापडले. याची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे स्थानिक निवासी नव्हते अशी प्राथमिक माहिती आहे. तेंगनापौल जिल्हा म्यानमारच्या सीमेवरच आहे.



मणिपूर हिंसा


या वर्षी मे महिन्यात या राज्यात हिंसाचाराची आग पेटली होती. यानंतर हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आणि तब्बल १७५ लोकांचा जीव गेला. अधिकतर भागामध्ये आजही इंटरनेट बंद आहे. हिंसादरम्यान दोन महिलांसोबत झालेल्या अपमानजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी याची निंदा केली होती तसेच न्याय मिळेल असाही विश्वास दिला होता.


या हिंसाचाराशी संबंधित सीबीआय तपास करत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे. संसदेत असो वा निवडणूक रॅलीदरम्यान या हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.

Comments
Add Comment