Rajesh Tope Car : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड का केली?

  278

जालना : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर आज अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. जालना (Jalana) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली टोपे यांची गाडी पार्क केलेली असताना या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीची समोरची काच फुटली. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली.


हल्ल्यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. शिवाय चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.


जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्ताने राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही.


मराठा आरक्षणासारख्या (Maratha reservation) धगधगत्या मुद्दयामुळे मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळीच राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहोचून पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक