जगात Veg खाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात? भारत कितव्या स्थानी

  219

मुंबई: जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार वीगन आणि शाकाहारी खाणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अॅटॅकसह अनेक आजार नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जगातील अव्वल ६ शाकाहारी देश कोणते आहेत?या यादीत भाकत कितव्या स्थानावर आहे.


व्हेज खाणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर भारत देश आहे. येथे ३८ टक्के लोक शाकाहारी जेवण घेतात. हरयाणा आणि राजस्थान ही अशी राज्ये आहेत जिथे सर्वाधिक शाकाहारी राहतात.


शाकाहारी खाण्यामध्ये दुसऱ्या स्थानावर इस्त्रायल हा देश आहे. येथे राहणारे १३ टक्के लोक शाकाहारी जेवणाचे सेवन करतात. येथील लोकांच्या मते भूक भागवण्याची जनावरांची कत्तल करणे योग्य नाही.


तिसऱ्या स्थानावर तैवान आहे. येथे १२ टक्के लोक व्हेज खाणे पसंत करतात. येथे अनेक शाकाहारी हॉटेल्स आहेत. खाद्य पदार्थांवर स्वस्तिकचे चिन्ह काढलेले असते.


शाकाहारी खाण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर इटली हा देश आहे. येथे व्हेज खाणाऱ्यांची संख्या १० टक्के आहे. इटली हा देश नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पीयूच्या रिसर्चनुसार येथे व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.


पाचव्या स्थानावर छोटासा देश ऑस्ट्रिया आहे. येथील ९ टक्के लोक व्हेज खाणे पसंत करतात. ऑस्ट्रियाचे शाकाहारी जेवण अधिक गोड असते आणि यात अनेक पदार्थांचा समावेश असतो.


व्हेज खाणाऱ्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर युरोपियन देश जर्मनी आहे. येथील लोक मांसाहाराला पसंती देतात. मात्र ९ टक्के लोक अजूनही पूर्ण शाकाहारी खाण्यावर अवलंबून आहेत.

Comments
Add Comment

हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे ६३ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी