अपारशक्ती खुराणाचं नवीन 'तेरा नाम सुनके' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेता तर आहे सोबतीने तो एक उत्तम संगीतकार गायक देखील आहे. संगीत कौशल्य दाखवून त्याने अभिनयाच्या सोबतीने आपली ही बाजू देखिल पक्की केली आहे. नुकतेच त्याचं 'तेरा नाम सुनके' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


यापूर्वी 'कुडिये नी' या गाण्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि गाणं सुपरहिट ठरलं. २५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून हे गाणं आजही तितकच ट्रेंड मध्ये आहे. अपारशक्तीचे 'तेरा नाम सुनके' हे गाणं एक हृदयस्पर्शी संगीतमय कथा भावपूर्ण गीत यांचं अनोखं मिश्रण आहे. निर्मान यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आलं आहे.





आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलताना अपारशक्ती म्हणतो "मला वाटते की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करतोच आहे आणि अजून नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळणे, होस्टिंग, गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल "कुडिये नी" ला इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाईवर खूप प्रेम मिळाल्यानंतर आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मी लिहिलेलं संगीतबद्ध केलेली ही गाणी प्रेक्षकांना मोहित करून जातील यात शंका नाही."


'तेरा नाम सुनके' चाहत्यांना आणि संगीत रसिकांना अपारशक्ती खुराणा यांच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार तर आहेच आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या 'बर्लिन' या चित्रपटाच्या यशानंतर अपारशक्ती उंच भरारी घेत राहणार आहे. बर्लिन व्यतिरिक्त अपारशक्ती पुढे बहुप्रतीक्षित "स्त्री २" मध्ये दिसणार आहे आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित "फाइंडिंग राम" या आकर्षक माहितीपटात तो झळकणार आहे.

Comments
Add Comment

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित