ओबीसींविरोधी बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची भाषा करणा-या बबनराव तायवाडेंवर गुन्हा दाखल

  86

हिंगोली : ओबीसींविरोधी बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची भाषा करणारे ओबीसी नेते (OBC Leaders) बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्याविरोधात हिंगोली (Hingoli) शहर पोलीस ठाण्यात चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


२६ नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) जाहीर सभेत बोलताना तायवाडे यांनी "ओबीसी (OBC) विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा", असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने तक्रार देण्यात आली होती.


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. या मेळाव्यात बोलताना बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे तायवाडे म्हणाले होते. तसेच, याच मेळाव्यात बोलताना बबनराव तायवाडे यांनी "यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा," असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी