चेंबुरमध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळले; ४ जण गंभीर जखमी

  137

मुंबई : चेंबुर (Chembur) परिसरात जुनी बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) मोठा स्फोट झाला. त्यामुळे घर कोसळल्याची घटना घडली.


चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात हा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये पहिल्या मजल्यावरून ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.




Comments
Add Comment

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०