Main Atal hoon : बहुचर्चित 'मैं अटल हूँ' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

पंकज त्रिपाठी यांनी शेअर केले नवे पोस्टर


मुंबई : नव्या भारताचं स्वप्न बाळगणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि एक उत्तम कवी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यातील अटलजींची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हा सगळ्यांचाच आवडता अभिनेता आहे. अटलजींच्या वेशातला त्याचा पहिला लूक समोर आल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. आनंदाची बाब म्हणजे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.


'मैं अटल हूँ' (Main Atal hoon) असं या चित्रपटाचं नाव आहे. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपकडून निवडून आलेले देशाचे पहिले पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारताला विकसित करण्याच्या दृष्टीने अनेक कामे केली आणि भारतीयांच्या मनात एक आदराचे स्थान मिळवले. त्यांची हीच कारकीर्द 'मैं अटल हूँ' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.


पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत. पोस्टखाली त्यांनी लिहिलं आहे,"एक कवी ज्यांनी इतिहास पुन्हा लिहिला". 'मैं अटल हूँ' हा सिनेमा १९ जानेवारी २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवर 'हार्ट ऑफ स्टोन...मॅन ऑफ स्टील' असं लिहिलं आहे.


'मैं अटल हूँ' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) याने सांभाळली आहे. तर या सिनेमाचं कथानक ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिलं आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत