Pooja Sawant engaged : पूजा सावंतने केले हार्टब्रेक; जुळला मनाचा धागा! कोण आहे ‘तो’?

Share

जोडीदारासोबत फोटो शेअर करत पूजा सावंतने केली मोठी घोषणा

मुंबई : पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी सिनेसृष्टीत सुपरहिट चित्रपट (Marathi movies) देणारी एक अभिनेत्री (Actress) आहे. तिचे लांबसडक केस आणि देखण्या रुपामुळे ती अनेक तरुणांची क्रश बनली आहे. मात्र, तिच्या नव्या घोषणेमुळे अनेकांचा हार्टब्रेक (Heartbreak) झाला आहे. पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media account) आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे. तर अनेक जणांनी तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजाने आपल्या सोशल मीडियावर जोडीदारासोबतचे तीन फोटोज शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पहिल्या फोटोत समुद्रकिनार्‍याजवळ पूजा आणि तिचा जोडीदार रोमँटिक पद्धतीने एकमेकांना मिठी मारुन उभे आहेत. ‘खास व्यक्तीसोबत नव्या अध्यायासाठी माझ्या मनाची कवाडं खोलत आहे’ (opening my heart to new chapter with my special one) असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दुसर्‍या फोटोत पूजा आणि तिचा जोडीदार स्विमिंग पूलजवळ एकमेकांना मिठी मारुन उभे आहेत. ‘हा फोटो प्रेमाच्या जादूसाठी आणि आमच्या पुढील सुंदर प्रवासासाठी’ (Here’s to the magic of love and to our beautiful journey ahead) असं कॅप्शन पूजाने दिलं आहे. तर तिसर्‍या फोटोत आम्ही एकमेकांसोबत बांधले गेले आहोत (We are engaged), अशी घोषणा पूजाने केली आहे. अनेकांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना पूजा म्हणाली होती की,”माझा लिव्ह इनपेक्षा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मला लग्न करायचं आहे. आयुष्यात स्थिरता हवी आहे. त्यामुळे ज्याच्यासोबत उरलेलं आयुष्य आनंदात घालवू शकते असा पार्टनर हवा आहे”. त्यामुळे या पार्टनरची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. तिने जोडीदाराची झलक दाखवली असली तरी त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पूजाचा जोडीदार नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

पूजाचा दगडी चाळ (Dagadi Chawl) हा सिनेमा प्रचंड गाजला. यातील ‘मन धागा धागा’ (Man Dhaga Dhaga) हे गाणं तरुणांच्या विशेष आवडीचं आहे. सोबतच पूजाने क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस, लपाछपी अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आपल्या उत्तम अभिनयाने आणि नैसर्गिक सौंदर्याने तिने स्वतःचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोबतच ती नृत्यांगणादेखील आहे. पूजा आता आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

14 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

53 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago