Mumbai AQI : अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी ठरला देवदूत; हवेची गुणवत्ता सुधारली

  203

जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील हजारो बांधकामे, वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या, उद्योगांतून बाहेर पडणारे विषारी वायू यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) प्रचंड खालावली होती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ३०० च्या पार पोहोचला होता, जो अत्यंत खराब हवा दर्शवतो. त्यात भर पडली ती दिवाळीत (Diwali) मनसोक्त फोडलेल्या फटाक्यांची. वारंवार सूचना देऊनही मुंबईकरांनी हवे तसे फटाके फोडले. त्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी आणखी खालावली. मात्र, नुकताच झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) मुंबईकरांसाठी देवदूत ठरला आहे. पावसामुळे मुंबईतील हवा चांगलीच सुधारली आहे.


रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली येण्यास मदत झाली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १००च्या खाली आहे. बीकेसीचा AQI १०३ वर आहे. आज देखील मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.



जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


एकूण मुंबई - ६० AQI
कुलाबा - ७६
भांडुप - ३७
मालाड - ३५
माझगाव - ४७
वरळी - ३३
बोरिवली - ६५
बीकेसी - १०३
चेंबूर - ८९
अंधेरी - ६७
नवी मुंबई - ५३



हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


० ते ५० AQI - उत्तम
५० ते १०० AQI - समाधानकारक
१०१ ते २०० AQI - मध्यम
२०१ ते ३००० AQI - खराब
३०१ ते ४०० AQI - अतिशय खराब
४०१ ते ५०० AQI - गंभीर

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना