Bus Accident: धावत्या बसचे निखळले चाक, भर रस्त्यात बस झाली पलटी...

सोलापूरहल डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाली होती. बसमधून जवळपास १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहरा जवळ असलेल्या उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटला आणि चाक निखळला. जॉईंट तुटल्याने धावती बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला.


धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


 सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताची भीषणता मोठी होती, धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताठिकाणी दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे