तेलंगणा: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत(telangana assemble election) भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) जोरदार रॅली करत आहेत. यातच रविवारी तेलंगणाच्या निर्मल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका रॅलीदरम्यान काही लोक खांबांवर चढले. हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना खाली उतरण्याचे आवाहन केले.
त्यांना आवाहन करताना मोदी म्हणाले, खाली या मित्रांनो, तुमच्यामधला जर कोणी पडला तर मला दु:ख होईल. ते म्हणाले, हे जे वर चढले आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी खाली या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, इतकी गर्दी आहे की मला माहीत आहे की तुम्ही मला पाह शकत नाही आहात. मात्र कोणी जर पडले तर मला अधिक दु:ख होईल. प्लीज तुम्ही खाली या मित्रांनो. तुमचे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. मात्र तुम्ही खाली या.