Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीChhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या दोन संतापजनक घटना!

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या दोन संतापजनक घटना!

सावत्र बापाने केला अश्लील व्हिडीओ तर दुसर्‍या घटनेत शेजार्‍याने बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातून दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत एका १४ वर्षीय मुलीच्या सावत्र बापाने तिच्यावर अत्याचार करत, विवस्त्र करत तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. तर, दुसर्‍या घटनेत शेजार्‍याने घरात कोणी नसल्याची संधी साधत एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला बळजबरी बाथरुममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केले. या दोन्ही घटनांमुळे छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.

पहिल्या घटनेत गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तिच्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नराधमाने मुलीला विवस्त्र करत तिचा मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर परिसरातील ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यांनतर तिचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तिला विवस्त्र करत तिचे मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

शेजार्‍याने बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत घरात कोणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला बळजबरी बाथरुममध्ये नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणातील पीडितेचे आई-वडील हे बिगारी काम करतात. दरम्यान, कामानिमित्त ते छत्रपती संभाजीनगरात राहण्यासाठी आले होते. तर पीडिता ही आजीच्या गावी शिक्षण घेत होती.

घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी ही आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. २० जून २०२२ रोजी पीडितेचे आई-वडील हे कामावर गेले होते. तर घरी पीडिता व तिचा लहान भाऊ असे दोघे जण होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडितेचा लहान भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. ही संधी साधत पीडितेच्या खालच्या मजल्यावर राहणारा लखन नरवडे हा पीडितेच्या घरी गेला व तुझा लहान भाऊ तुला खाली बोलावत असल्याचे सांगितले. मात्र, पीडिता घराबाहेर आली नाही. त्यामुळे आरोपी पीडितेच्या घरात बळजबरी घुसला आणि हात धरुन तिला बाथरुममध्ये नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या लखन नरवडेला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तसेच विविध कलमांखाली २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधीश ए.एस. वैरागडे यांनी गुरुवारी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -