मुंबई: मनुका(raisin) हे असे ड्रायफ्रुट आहे ज्यात भरपूर पोषकतत्वे आहेत. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत मनुका स्वस्त दरात मिळतात. मात्र याचे फायदे इतके आहेत की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हे असे सुपरफूड आहे ज्यामुळे अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते.
मनुक्याचे फायदे
आर्यनची कमतरता दूर होते. ज्या लोकांना अॅनिमियाचा त्रास आहे तसेच ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची समस्या आहे त्यांनी दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्याने खूप फायदा मिळतो.
दात आणि हाडे होतात मजबूत
मनुक्यामध्ये अनेक पोषकतत्वे आहेत. जसे कार्बोहायड्रेट, आर्यन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटामिन आणि प्रोटीन पोटॅशियम ही तत्वे दात आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने दात तसेच हाडांना मजबूती मिळते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
ज्या लोकांची नजर कमकुवत आहे त्यांनी मनुक्याचे सेवन सुरू केले पाहिजे. कारण यात व्हिटामिन ए, बीटा कॅरोटिन, अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हृदयाचे आजार दूर करण्यासाठी तुम्ही मनुक्याचे सेवन करू शकता. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
दिवसभर राहतो एनर्जेटिक
मनुक्याला कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत मानला जातो. यात अमिनो अॅसिड असते ज्यामुळे वर्कआऊटनंतर तुम्हाला मसल्स लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते
मनुक्यामध्ये डाएटरी फायबर आणि प्रोबायोटिक असतात. ही दोन तत्वे पोटात चांगले आणि निरोगी बॅक्टेरिया बनवण्यास मदत करतात. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात
मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात जे शरीराच्या आतील सोडियमचा प्रभाव कमी करू शकतात. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.