मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशातच लोक निरोगी(healthy) राहण्यासाठी काळजी घेत असतात. थंडीत लोक गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याला पसंती देतात. दरम्यान, अनेकजण कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.
दरम्यान, आपल्या आरोग्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते की थंड पाण्याने हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते. आंघोळीसाठी पाणी जास्त गरम असता कामा नये.
थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शरीरही मोकळे होण्यास मदत होते. या पाण्याने शरीराची चांगली स्वच्छता होते. तसेच सर्दीपासून आराम मिळतो. दरम्यान, त्वचेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये.
दरम्यान, थंड पाण्याने आंघोळ करण्याने काही नुकसान होत नाही. कोणत्याही मोसमात थंड पाण्याने आंघोळ केली जाऊ शकते. दरम्यान, रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. दरम्यान ताज्या पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.
ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तसेच ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…