Crime : वर्ल्डकपचा सामना आणि छट पुजा सुरू असतानाच सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई : मुंबईत एकिकडे वर्ल्डकपचा सामना आणि दुसरीकडे छट पुजा सुरू असतानाच कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह (Crime) आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.


सीएसटी रोड शांतीनगरच्या समोरिल बाजूला मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. या ठिकाणी एक बेवारस सुटकेस असल्याचा एक फोन रविवारी दुपारी कुर्ला पोलीस ठाण्यात आला. छट पुजा आणि वर्ल्डकप फायनलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तपास केला असता बॅगेत चक्क एका महिलेचा मृतदेह असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली. महिलेचा मृतदेह राजावाडी रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान या प्रकरणात खुनाची बाब स्पष्ट आहे. तसेच या महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४०च्या दरम्यान असून तिने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेली आहे. तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये दुमडलेल्या अवस्थेत होता. मात्र अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर या परिसरामध्ये कोणतीही महिला बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल झाल्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिसांकडून तिच्या फोटोवरून तिचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवार-मंगळवारी या ठिकाणी मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)